जिल्हा
तुमसर बस स्थानक आगारात पाणी टपकणारी बस…
प्रवासी छत्री घेऊन बसले
डॉ. सुखदेव काटकर प्रतिनिधी
तुमसर वार्ता:-तुमसर शहराच्या बस स्थानक आगारात बसेस च्या वरच्या छतावरून पाणी आत मध्ये येत असता प्रवासी ने चक्क छत्री घेऊन बसावे लागले ही बस स्थानक अधिकारी व सुपरवायझर यांची चुकी असल्याचे निदर्शनास आले.
ही घटना ७/७/२०२५ ची घटना आहे.बस क्रमांक एम. एच 07 C 9544 तुमसर ते चिखला गावाला निघाली असता बसच्या छतावरून पाणी आत मध्ये येत होता सीटवर बसलेल्या महिलेला छत्री धरुन बसावे लागले विशेष म्हणजे कंडक्टर प्रवाशाचे हाल पहात असुन स्वत: ड्रायव्हर च्या केबिन मध्ये बसुन छत्री धरलेल्या महिला कडे बघून तमाशा पहात होता. ड्राईव्हवर आणि कंडक्टर वर प्रवाशांच्या सुरक्षेची जवाबदारी असते.



