क्राइम
देह व्यापार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड…

भंडारा वार्ता:-भंडारा स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार भंडारा येथील रमाबाई आंबेडकर वार्डामध्ये एका दुमजली राहत्या घरामध्ये चालणाऱ्या देह व्यापार अड्यावर धाड मारली. या गुन्हेगारीत मुख्य आरोपी संगिता धारगावे आणि तिच्या सोबत अन्य दोन आरोपी यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल फोन📱 व रोख रक्कम असा मिळुन 21,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरुद्ध स्त्री अनैतिकत व्यापार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सपोनि चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात महीला पोहवा कुथे, महि. पोहवा घरडे व स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदार यांनी केली.