मोहफुल दारु वर पोलीसांची कार्यवाही…

करडी पोलीसांची कार्यवाही…
करडी वार्ता:-करडी पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत हे पोलीस कर्मचाऱ्यांसह पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार देव्हाळा तिरोडा महामार्गावर नरसिंग टोला फाट्याजवळ नाकाबंदी करुन रेनॉल्ट कंपनी च्या कारमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये 1 लाख 26 हजार रु. किंमतीच्या 9 प्लास्टिक पिशव्या मध्ये 630 लिटर मोहफुल दारू मिळुन आली.
वाहन चालक दिलीप गायधने राआ. कुशारी यांना विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की ही अवैध दारू तिरोडा तील रामु नामक ईसमाकडून आणली असुन दारू व चार चक्की कार प्रफुल्ल बावने रा. कुशारी यांची आहे असे वाहन चालकाने सांगितले.
सदर प्रकरणी करडी पोलीसांनी 1 लाख 2600 रु. किंमती चा मोहफुल दारू व 9 लाख 40,000 रु. किंमती ची रेनॉल्ट कंपनी ची कार असा एकुण 10 लाख 66,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तिन्ही आरोपी विरुद्ध महा. दारू बंदी कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे , उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा काळे यांच्या मार्गदर्शनात करडी पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत,

पीएस आय डोंगरे, पोशि अरुण काळसर्पे, निखिल कोचे सैनिक निबार्ते यांनी केली.