गोवंश वर निर्दयी पने वागणूक करणाऱ्यांवर कार्यवाही…

अड्याळ वार्ता:-
भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्याला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा आकोट येथे अकरा गाय व गोरे गोवंश जनावरे खाली प्लाटवर चिखलात त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था न करता दोराने लोखंडी साखळी ने जनावरांना बांधून ठेवल्याचे मिळुन आल्याने आरोपी धनराज तुकाराम वैद्य रा. पवनी याला ताब्यात घेऊन एकुण जनावरांची कि. 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. तसेच मौजा आंबाळी येथे 28 जनावरास चारा-पाणी न करता आखुळ दोराने वेदना होईल अशा पद्धतीने बांधून ठेवल्याने आरोपी भास्कर चावरे रा. आंबाळी यांच्या ताब्यातून एकुण जनावरांची कि. 1 लाख 25 हजार रुपयांची गोवंश जातीचे मुद्देमाल मिळुन आले.
अड्याळ पोलीस स्टेशन चे ठाणेदार धंनजय पाटील
यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मांदाळे व कर्मचाऱ्यांनी दोन्ही ठीकानाची जनावरांना निर्दयपणे वागणूक करणाऱ्या दोन्ही आरोपी वर मोठी कार्यवाही करुन एकुण 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा नोंद करण्यात आला.
