क्राइम
अवैध रेती वाहतुकीवर कार्यवाही…

5 लाख 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…
सिहोरा वार्ता:-तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा वारपिंडकेपार रस्त्यावर अवैध रेती वाहतुक करणाऱ्या आयसर कंपनीचा ट्रॅक्टर बिना क्रमांकाच्या ट्रॉलीमध्ये अवैध रेती वाहतुक करताना आरोपी अमित चौहान रा. सिहोरा यांच्या ताब्यातून 1 ब्रास रेती कि. 6,000 रु. ट्रॅक्टर ची कि. 5 लाख असी एकुण 5 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व सिहोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांच्या मार्गदर्शनात पोहवा कडपते, पोशि मेहर यांनी केली पुढील तपास पोलीस स्टेशन चे अधिकारी करीत आहेत.