तुमसर नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी साठी लागली होळ…

तुमसर चुनावी वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगरपालिका येथे नगराध्यक्ष पदासाठी विविध पक्षाच्या उमेदवारांमध्ये चांगली च उत्सुकता दिसून येत आहे. तुमसर शहरात बॅनर पोस्टर व प्रसार माध्यमांतून चुनावी वातावरण तापले आहे. काही इच्छुक उमेदवार मतदारांचे विश्वास रस्त्यावर बोलुन किंवा परस्पर घरी जाऊन विश्वास जिंकत आहेत. इच्छुक उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आपण केलेल्या कामाची नागरीकांना जाणीव करून देत आहेत. तर काही उमेदवार निवडून आल्यावर शहराचा कसा विकास करणार याची चर्चा होत आहे. यामध्ये भाजप पक्षातील ईजी. प्रदीप पडोळे माजी नगराध्यक्ष, सचिन बोपचे माजी सभापती, पंकज बालपांडे माजी सभापती, आशिस कुकडे माजी नगरसेवक, शिवसेना शिंदे गटातुन कल्याणी भुरे, राष्ट्रवादी अजित गट अभिषेक कारेमोर, योगेश सिगंणजुळे ही नेते मंडळी नगराध्यक्ष पदाची टिकीट मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

निवडणूकीची तारीख आतापर्यंत जाहीर झाली नाही. पक्ष आणि मतदार कुणाला आशिर्वाद देतात ह्या तुमसर नगरवासीयांचे लक्ष वेधले आहे.
