अवैध रेती वाहतूकीवर पोलीसांची कार्यवाही…
तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर पोलीस स्टेशन चे कर्मचारी तुमसर पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मौजा बाम्हणी ते कोष्टी रस्त्यावर बाम्हणी येथे एक स्वराज कंपनी च्या ट्रक्टर मध्ये वैनगंगा नदी पात्रातुन कोणतीही परवानगी न घेता रेती उत्खनन करतांना मिळुन आल्याने आरोपी चालक अरविंद सेलोकर रा. बाम्हणी व मालक जयेंद्र काहालकर रा. बाम्हणी यांच्या ताब्यातुन ट्रक्टर ट्रॉली व एक ब्रास रेती अशी एकूण किंमत 5 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने गुन्हा नोंद करण्यात आला.

तसेच दुसरी कार्यवाही मौजा बाम्हणी वैनगंगा नदी काठी बिना नंबर चा सोनालिका कंपनी चा ट्रॅक्टर मध्ये कोणतीही परवानगी न घेता वैनगंगा नदी पात्रातुन रेती उत्खनन करुन रेती चोरी करतांना मिळुन आल्याने आरोपी चालक मालक शुभम काहालकर याच्या ताब्यातुन ट्रॅक्टर ट्रॉली व एक ब्रास रेती अशी एकूण किंमत 6 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने दोन्ही कार्यवाह्या वर आरोपी विरुध्द महा. जमीन महसूल अधि. सह. 7,9 पर्यावरण संरक्षण अधि सह. कलम 3(1) /181 मोवाका नुसार सदर चा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची पोलीस

अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे तुमसर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोपपदी गंगवानी, पोशि. तिलक चौधरी, पोशि घोळमारे पोलीस स्टेशन यांनी केली.




