मंडई जलशा मध्ये होणाऱ्या कार्यक्रमावर पोलीसांची कडी नजर…

भंडारा वार्ता:-दिवाळी निमित्ताने होणाऱ्या शहर आणि ग्रामीण भागात मनोरंजनाच्या माध्यमातून लावण्या डांस कार्यक्रम घेण्यात येतात, ह्या कार्यक्रमात अश्लिल नृत्य होणाऱ्या कार्यक्रमावर पोलीसांची कडी नजर असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळते आहे. दोन वर्षांपूर्वी गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात मंडई निमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात अश्लिल नृत्य झाल्याची घटना घडून आली होती ही घटना मंत्रालयापर्यत गेली होती त्या कारणाने विधानसभा प्रश्न सुध्दा गाजला होता. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी निलंबित झाले होते तर गोबरवाही थानेदारांची तडकाफडकी बदली सुध्दा झाली व आयोजकासह कित्येकावंर गुन्हे सुध्दा दाखल झाले. अशा अश्लिल कार्यक्रमाची पुनरावृत्ती होऊ नये ह्यासाठी भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन ला सक्त निर्देश दिले की मंडई जलसा निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे.

माहिती मिळाली आहे की भंडारा जिल्हात येणाऱ्या काळात नगरपालिका च्या सुध्दा निवडणूका असल्याने जिल्हा पोलीस दल ह्या कार्यक्रमात विशेष लक्ष देणार असल्याची माहिती मिळते आहे..