करमाळा, एकात्मिक बाल विकास सेवा विभाग व अंगणवाडी कर्मचारी भगिनींचे जबरदस्त लोकनृत्य स्पर्धेत सादरीकरण…
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क वार्ता प्रमिला जाधव,(पश्चिम महाराष्ट्र)सहसंपादक

कळमना वार्ता:- करमाळा. सोलापूर, जिल्हा परिषद सोलापूर आयोजित पदाधिकारी, अधिकारी, व कर्मचारी क्रिडा व संस्कृतीक स्पर्धा अंतर्गत सन 2023 -24 विविध गुणदर्शन व संस्कृतीक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, या स्पर्धेत एकात्मिक बाल विकास प्रकल्प करमाळा तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी यांचा नुकताच सुपरहिट झालेल्या चित्रपटातील बाईपण भारी देवा मधील मंगळागौर या गीतावर जबरदस्त असे सादरीकरण करुन उपस्थित प्रेक्षकांचे मने जिंकली व वन्समोर सादरीकरणासाठी टाळ्यांचा गडगडाट आवाजात प्रेक्षकांनाही प्रोत्साहन दिले. या गीतामध्ये सहभागी झालेल्या अंगणवाडी कर्मचारी भगिनींचे सादरीकरण झाल्या नंतर डेप्युटी सिईअो साहेब तसेच करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. मनोज राऊत साहेब यांनी सर्व अंगणवाडी भगिनींचे अभिनंदन केले.


या लोकनृत्य स्पर्धेत सहभागी झालेल्या अंगणवाडी कर्मचारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करमाळा पर्यवेक्षिका मा लोपामुद्रा पांडुरंग आतकर मॅडम, योगिता संदीप शिंदे अंगणवाडी सेविका ( पोथरे ) सौ. आशा चांदणे अंगणवाडी सेविका (कुंभेज) रुबिना कमुलाल मुलाणी अंगणवाडी सेविका (क) 1 , शितल श्रीकांत चव्हाण अंगणवाडी मदतनीस (देवीचामाळ 2), हिराबाई राजेंद्र देमुंडे अंगणवाडी मदतनीस (अंजनडोह 2) तेजस्वीनी सतिश घोडके अंगणवाडी सेविका (बिटरगाव श्री), सोनम राहुल शिंदे अंगणवाडी सेविका (वाशिंबे १), ललिता शांतीलाल वलटे अंगणवाडी सेविका (चौधरी वस्ती उमरड) सलमा शेख अंगणवाडी मदतनीस ( चौधरी वस्ती उमरड) या सर्व अंगणवाडी कर्मचारी भगिनीं सहभागी झाल्या होत्या, यावेळी उपस्थित प्रकल्प करमाळा पर्यवेक्षिका मा चोले मॅडम, अंगणवाडी सेविका माया पवळ , अंगणवाडी सेविका सौ. बनसोडे बिटरगाव याचे सहकार्य लाभले.
