आंबागड ते रामपूर-गायमुख देवस्थान पर्यंत रस्त्याचे काम सुरु.. !
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

तुमसर तहसील वार्ता:-भंडारा जिल्ह्यामधील तुमसर तालुक्यातील गायमुख येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रेचा आयोजन करण्यात येते ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने दुरदुरुन श्रधालु होतात .

यात्रा यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्वच विभागाची बैठक गायमुख स्थळी घेण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन सर्वतोपरी यात्रा यशस्वी पणे पार पाडण्यासाठी प्रयत्न शिल आहे. परंतु आबांगड गायमुख ह्या रस्त्याची स्थिती दयनीय असल्याने शिवसेना विभाग प्रमुख अमित मेश्राम यांनी भंडारा जिल्हा परिषद चे कार्यकारी अभियंता अब्दुल जावेद यांना निवेदन देऊन हि बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. अब्दुल जावेद कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित उपअभियंता सुरेश मस्की यांना तात्काळ रस्ता दुरस्ती चे आदेश दिले ज्यावरून डांबरीकरणाचे काम सुरु झाले जेणेकरून महाशिवरात्री गायमुख यात्रेला येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना सुविधा मिळु सके!