देश

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने

आंतरराज्य सीमेवरील जिल्हामध्ये समन्वय बैठक संपन्न

मा. छेरींग दोरजे, विशेष पोलीस महानिरिक्षक, परिमंडळ नागपूर  यांनी  सदर  बैठकीचे  अध्यक्ष स्थान भुषविले.

          यावेळी उपस्थित सर्व अधिका-यांनी आपले कार्यक्षेत्रातील आंतर राज्य सिमेवरील तपासणी नाके व लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने रोख रक्कम, मद्य अंमली पदार्थ, वस्तू इत्यादीचे बेकायदेशिर वाहतूक यावर नियंत्रण व पर्यवेक्षण च्या अनुषंगाने नियोजन सादर केले श्री. दोरजे यांनी सर्व उपस्थितांना आंतर राज्य सिमेवरील निवडणूक काळातील विविध वस्तू, मद्य, अंमली पदार्थ, रोख रक्कम इत्यादी यांची वाहतूक यावरील नियंत्रण व निवडणूक कालावधीत गुन्हेगारी आटोक्यात आणणेकामी समन्वयाने कामकाज करणेबाबत महाराष्ट्र व मध्यप्रदेश मधील उपस्थित अधिका-यांना सुचना दिल्या.

सदर वेळी योगेश कुंभेजकर जिल्हाधिकारी भंडारा, यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. तसेच लोहीत मतानी जिल्हा पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button