क्राइम
तलावात बुडून युवकाचा मृत्यू…

साकोली वार्ता:-साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निलज गावातील प्रतिक सुखदेव शेंडे (19 वर्ष) हा युवक कमळाचे फुले काढण्यासाठी तलावात उतरला असता खोल पाण्यात जाऊन मृत्यू पावला. ह्या दुर्दैवी घटनेमुळे गावात तसेच परीसरात शोकांतिक वातावरण पसलेला आहे. फिर्यादी निलेश रामा शेंडे यांच्या तोंडी तक्रारी वरुन साकोली पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद करून कलम *१९४ नागरिक सुरक्षा संहिता* २०२३ अंतर्गत दर्ज करण्यात आले. पुढील तपास साकोली पोलीस स्टेशन चे ठाणेदार महादेव आचरेकर व त्यांचे सहकर्मी करीत आहेत.




