18 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यत जादा वाहतुक”बससेवा सरु

जास्तीत जास्ती प्रवासानी लाभ घ्यावा
भंडारा,दि.17 : 18 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2025 रोजी पर्यत दिवाळीनिमित्त जादा हंगाम वाहतुक राज्य परिवहन भंडारा विभागामार्फत करण्यात येत असल्याने सदर कालवधीत रा. प. भंडारा विभागातील भंडारा, गोदिंया, साकोली, तुमसर, तिरोडा व पवनी बसस्थानकावरून खालील प्रमाणे अतिरीक्त जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले आहे.
जाताना व येताना
भंडारा,तुमसर व मार्ग हिंगणघाट 15.20 जातानी व येतानी 6.15 वाजता
तुमसर,ते चंद्रपूर वेळ : सकाळी 7.00 वाजता येताना 13.30 वाजता
तिरोडा ते शेगाव सकाळी 9.00 वाजता येतानी 8.00 वाजता
तिरोडा ते अमरावती सकाळी 7.15 येतानी 14.30 वाजता
पवनी ते वरुड सकाळी 9.30 येतानी 15.30 वाजता राहील.
वरिल फे-या प्रवासी वर्दळ पाहून टप्याने सुरु करण्यात येणार असून त्यानुसार सदरच्या फेऱ्या संगणकीय आरक्षण प्रणालीवर (रिजर्व्हेशन) उपलब्ध राहतील तसेच प्रवासी गर्दीचा प्रदिसाद बघून बसस्थानकावरून शिवशाही, निमआराम, साधारण बसेस वेळोवेळी नागपूर मार्गावर अतिरीक्त सोडण्यात येणार, आहेत
तरी सर्व प्रवासी बांधवानी दिवाळी जादा हंगाम २०२५ करीता लावण्यात येणाऱ्या बसेसचा वापर करण्याकरीता रा. प. महामंडळ भडारा विभागामार्फत आव्हान करण्यात येत आहे. तरी सर्व प्रवाशी बांधवानी अवैध प्रवासी वाहनाने प्रवास करणे टाळून रा. प. महामंडळास सहकार्य करावे असे जाहिर आव्हान विभाग नियंत्रक रा.प. भंडारा यांचे मार्फत करण्यात येत आहे



