कोंबडी बाजारावर पोलीसांनी मारली धाड…

3 लाख 41 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त…
लाखांदूर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार मौजा ईटान पुलीया जवळ कोंबडयां च्या पायाला धारदार काती बांधून कोंबडयां ची झुंज लाऊन पैशाचा हार -जीत चा जुगार खेळतांना मिळुन आल्याने आरोपी अनिल मारबते मासळ, अतुल मेश्राम धामणी, निरंजन रामटेके विरली, तुषार ब्राम्हणकर दोलसर यांच्या ताब्यातून मोटर सायकला , लोखंडी काती, रोकड रक्कम असे एकूण 1 लाख 40 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दुसरी कार्यवाही मौजा मळेघाट ते चपराळ कडे जाणाऱ्या नहराजवळ मोकळ्या जागेत कोंबडयांची झुंज लाऊन हारा-जीत ची जुगार खेळवितांना आरोपी अमोल मखरे मळेघाट, अमोल तोंडरे आसोला, कृष्णा झोळे सिरोली, युवराज ठाकरे विहिरगाव यांच्या ताब्यातील मोटार सायकल, लोह्याची काती, मोटर सायकला, रोकड रक्कम असा एकुण 2 लाख 1 हजार 80 रु. मुद्देमाल जप्त करुन सदर गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही लाखांदूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सचिन पवार व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी करीत आहेत.



