नागपूर परि क्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धे चे समापण…

भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर नागपूर परि क्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा घेण्यात आली.

यामध्ये सहा जिल्ह्यातील पोलीस स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये चन्द्रपुर जिल्ह्यातील पोलीस दलाने उत्कृष्ट कार्य करुन प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत पुरुष आणि महिला दोन्ही गटाने भाग घेतले.

महिला गटात गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला. तर दुसरा क्रमांक चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस दलाने तर तिसरे स्थान भंडारा जिल्ह्यातील पोलीस दलाने मिळवले.

स्पर्धेच्या आयोजनात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. स्पर्धकांच्या मनोरंजनासाठी गोंडी डांस सारख्या स्थानिक आदिवासी कलांचे सादरीकरण करण्यात आले त्यामुळे स्पर्धकांना विदर्भातील संस्कृती चा अनुभव घेता आला. विजेता खेळाडूंचे आणि त्यांच्या मार्गदर्शकाचे परि क्षेत्रीय पोलीस प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले.



