अर्थ मंत्री ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राका बैठक संपन्न…
नागपूर, चंन्द्रपुर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा चे पदाधिकारी उपस्थित.
नागपूर वार्ता:-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत गणेशपेठ नागपूर कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यातील पक्षाच्या बैठकीकरणाचे संघटनात्मक विषयाची चर्चा करण्यात आली. या बैठकीत पक्षाची ताकत, संघटना बांधनी पक्ष मजबुती करण या संदर्भात सविस्तर माहिती पक्ष कार्यकर्त्यांना देण्यात आली.

मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते स्मृती चिन्ह व शाल श्रीफळ देऊन गोंदिया मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. राजेन्द्र जैन व संचालक पदी राजकुमार बडोले, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक पदी श्री नानाभाऊ पंचबुधे, श्री. प्रशांत पवार यांची निवड झाल्याबद्दल स्वागत केले.

या कार्यक्रमात आमदार राजु कारेमोरे, नागपूर ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर, महिला अध्यक्ष सुनीता येळणे, देवेंद्रनाथ चौबे, धंनजय दलाल, प्रेम कुमार रंहागडाले आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.