क्राइम
अवैध हातभट्टी वर धाड…
स्थानिक गुन्हे शाखेची विशेष कार्यवाही…
वरठी वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपी मन्नू गरजु यादव रा. आंबेडकर वार्ड वरठी मौजा सोनोली च्या शेतीमध्ये सुर नदीकाठावर हातभट्टी दारू वर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारुन 63,000/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सपोनि चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शनात पोहवा दोनोडे, पोशि शहारे, पोना पुराम स्था. गु. शाखा भंडारा यांनी केली.
स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ला कार्यवाही करावी लागते म्हणजे वरठी पोलीस कुंभकर्णी झोपेत आहे असी परीसरात चर्चा आहे. आणखी अनेक अवैध धंद्य्यावर कार्यवाही करणाची गरज आहे. मा.जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन सा.यांनी ह्या विषयावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.



