देश
वृषभ भुसारी चा सत्कार…

तुमसर वार्ता:- पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खैरलांजी गावात दहावी बोर्डाच्या परीक्षेत वृषभ परमानंद भुसारी याने जनता हायस्कूल तुमसर मधुन 95% प्रतिशत गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. त्या अनुषंगाने खैरलांजी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सौ. रिना रामेश्वर भुसारी यांच्या आदेशानुसार वृषभ परमानंद भुसारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन सत्कार करण्यात आला.

ह्या वेळी ग्रामपंचायत च्या सरपंचा सौ. रिना रामेश्वर भुसारी, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, शाळा समितीचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी व गावकरी बांधव उपस्थित होते.