देश
गोबरवाही पोलीसांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांनी ईद हा त्यौहार शांततेत पार पाडला..
मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहाने ईद साजरी केली
भंडारा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सितासावंगी गावात ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आली. त्याचप्रमाणे चिखला वस्तीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आष्टी मध्ये जामा मस्जिद, चिखला मध्ये दुर्गा चौकातिल ख्वाजा मस्जिद, पाशा कॅम्प आणि नाकाडोंगरी मध्ये मस्जिद जवळ भिड पाहवयास मिळाली.

गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार शरद शेवाळे यांनी ह्या सर्व गावात पोलीसांचा चोख बंदोबस्त बसविला असल्याने संवेदनशील भागात गस्त वाढविण्यात आली होती.