पालकमंत्री सावकारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न…

भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्हा पोलीस विभाग द्वारा *जागर नशा मुक्ती अभियान* अंतर्गत आयोजित चित्रकला प्रतियोगीता मध्ये तुमसर चे कन्या जुनीअर कॉलेज आणि शारदा विद्यालय कॉलेज इथल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सफलता मिळवली. विद्यार्थी नुकुल शहारे नी प्रथम क्रमांक तसेच बालीका ठवकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. ह्या विद्यार्थ्यांनींचा सत्कार 15 ऑगस्ट ला भंडारा जिल्ह्याचे *पालकमंत्री संजय सावकारे* यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ह्या कार्यक्रमात सांसद डॉ. प्रशांत पडोळे, आमदार व पूर्व पालकमंत्री परिणय फुके, जिल्हाधिकारी सावंत कुमार, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक जाधव, *तुमसर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय जी गायकवाड* हे उपस्थित होते.