क्राइम
मोटर सायकल सवार ईसमाचा मृत्यू…
झाडाची फांदी पडल्याने झाली घटना…
(बातमी संकलन-राजेश ऊके)
तुमसर वार्ता:-गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुंदरटोला गावातील सुरचंद कोडवते आपली बाईक घेऊन पेट्रोल भरण्यासाठी रात्री गेले होते पेट्रोल भरल्यानंतर परत येताना गोबरवाही ते सुंदरटोला च्या मधात पळसाच्या झाडाची फांदी गाडीवर पडल्याने गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांना उप जिल्हा रुग्णालय तुमसर येथे दाखल करण्यात आले त्यांना तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.माहीती मिळाली की मृतक चिखला मॉईल चा कर्मचारी होता.

ह्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोहवा लंकेश राघोर्ते करीत आहेत.



