सामाजिक

शेषराव गणविर यांनी वृक्षारोपण करुन केला वाढदिवस साजरा

तुमसर :- खापा आज दिनांक 06 जुन 2025 ला रोजी श्री.शेषराव रविचंद गणवीर तुमसर तालुका प्रमुख (प्रहार दिव्यांग संघटना) यांच्या वाढदिवसाच्या निमित्त स्मशान भूमी विहीरगांव रोड खापा (तुमसर) येथे वृक्षारोपण करुन त्यांचा वाढदिवस साजरा केला.


त्यांनी सांगीतले की, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण महत्वाच असते. त्याचबरोबर समाजातील घटकाला नवी चालना मिळावी या हेतूने गणविर यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करुन एक संदेश दिला. समाजात एक आगळा वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केला.


याप्रसंगी डॉ. मनोज कुमार नंदेश्वर (पशुधन विकास अधिकारी खापा तुमसर), श्री.खुशाल भोयर ग्रामपंचायत सदस्य, राजेंद्र पिकलमुंडे सामाजिक कार्यकर्ते, पप्पू भाऊ बोंदरे (प्रहार दिव्यांग संघटना अध्यक्ष मोहाडी) टवरचंद हाडगे प्रहार सेवक, लक्ष्मण अतकरी, धनराज ठवकर, धनराज मोहतुरे, चंद्रकला ठवकर प्रहार सेविका, वर्षा सिंगाडे मॅडम, स्मिरल गणवीर, रविचंद गणवीर, तसेच सर्व दिव्यांग,कामगार बांधव यांनी उपस्थित राहुन गणविर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button