कारधा पोलीस स्टेशनला ISO चा दर्जा
पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ साहेबांची पालकमंत्र्याकडून सराहना
भंडारा जिल्हा वार्ता:-मुख्यमंत्री 100 दिवसांचे (सात कलमी कार्यक्रम) यशस्वी आयोजन सुरु असताना, पोलीस स्टेशन कारधा जि. भंडारा येथे सदिच्छा भेट देण्यात आली.

ह्या पोलीस स्टेशनला ISO चा दर्जा मिळणे म्हणजे ह्या पोलीस स्टेशनच्या कार्यप्रणालीतील पारदर्शकता, शिस्त आणि जनतेसाठी असलेल्या सेवाभावाचे प्रतिक आहे. या यशामागे परिश्रम करणारे अधिकारी खऱ्या अर्थाने जनतेचे रक्षक आहेत. त्यांच्या सेवा, सजगता आणि समर्पनास मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी कारधा पोलीस स्टेशन चे ठाणेदार व ठाण्याच्या नुतनीकरणाबाबत अभिनंदन करण्यात आले.


कारधा पोलीस स्टेशनला पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा देण्यात आल्या.

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संजय सावकारे, खासदार मा. डॉ.प्रशांत पडोले, आमदार मा. नरेंन्द्र भोंडेकर, आमदार परिणय फुके, जिल्हाधिकारी मा.संजय कोलते, मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, कारधा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ , पोलीस कर्मचारी व गणमान्य नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.
