वाघाने केली म्हशीची शिकार
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गावकऱ्यांची मागणी
तुमसर (जंगल वार्ता) :-नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात गेल्या एक महिन्यापासून कित्येक वाघ, बिबट सारख्या हिंसक प्राण्यांनी पशु पालकाच्या गाय, म्हैस, बकरी सारख्या पाळीव प्राण्यांची शिकार केल्याची घटना समोर येत आहेत. वन अधिकाऱ्यांनी ह्या घटनेकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे.
काही दिवसांपूर्वी एका वाघाने पवणारखारी गावात गोठ्यात जाऊन आठ बकऱ्यांची शिकार केली होती!
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील पवनारा ह्या गावात चरवाईकरीता जाणाऱ्या म्हैशीच्या झुंडातुन दडी मारुन बसलेल्या वाघाने एका म्हैशीची शिकार केली. ही घटना 4 जुन ची असुन त्या वाघाने शिकारीला जंगलाकडे ओढून नेत असताना ती शिकार नाल्याजवळ सोडून पळ काढला व काही कालांतराने शिकारी कडे आला हे दृश्य स्वतः पशुपालक अरविंद हरीदास ऊईके रा. पवनारा ने आपल्या डोळ्यासमोर पाहिले!
क्षेत्र सहाय्यक वानखेडे, वनरक्षक देशमुख, मोरे, बनकर यांनी वाघाचे पगमार्ग बघितले व पंचनामा केला. वनविभागाने ट्रम कॅमेरे सुध्दा लावले असल्याचे क्षेत्र सहाय्यक यांनी माहिती दिली.



