मॅग्निज चोरांवर गोबरवाही पोलीसांची मोठी कार्यवाही!
गोबरवाही पोलीसांची कामगिरी.
तुमसर वार्ता:-नवीन ठाणेदार मा.शरद शेवाळे यांनी गोबरवाही पोलीस स्टेशन चा पदभार सांभाळताच गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात खुप दहसत निर्माण करुन अवैध धंदेना आळा बसविण्याचा कार्य सुरु केला. मागील दिवसात त्यांनी मोहफुलाची दारु, सट्टा, जुगार, रेती तस्करांवर , तसेच मॅग्निज चोरांवर सुध्दा सापळा रचुन कार्यवाही करत असल्याचे चित्र परीसरात पहायला मिळते आहे.

गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत चे पोलीस स्टाप नाकाबंदी करीत असताना स्व. ईंदिराबाई मरस्कोल्हे आश्रम शाळेजवळ आरोपी पृथीराज भलावी व गुलाब कुंभरे हे दोन्ही बाळापूर गावाचे असुन त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची बिना परवान्याची सुमो मध्ये 50 बॅग प्लास्टिक पिसव्या मध्ये (काळा दगड) मॅग्निज डोंगरी बुजुर्ग प्रतिबंधक क्षेत्रातुन 1 लाख 39 हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त केला.
आणि दोन्ही आरोपी विरूद्ध कलम 303(2) , 3(5) भा. द.वि.2023सह कलम 3(1), 181,50,177 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील कार्यवाही
जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सुचनेनुसार गोबरवाही पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शरद शेवाळे


यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय रोडे, पोशि.नेपाल गभने व उपरिकर करीत आहेत.



