तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत रेती ट्रॅक्टर वर कार्यवाही

आणखी कितीतरी अवैध ट्रॅक्टर आताही सुरू आहेत.
भंडारा वार्ता:-स्थानिक गुन्हे शाखा भंडारा हे तुमसर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना ग्राम तुडका येथे १) निळ्या रंगाचा बिना नंबर प्लेट चा ट्रक्टर चालक सुरेश शेंडे रा. बाम्हनी २) सिल्व्हर रंगाचा ट्रक्टर चालक दिनेश तितिरमारे रा. तामसवाडी यांच्या ताब्यातील ट्रक्टर मध्ये १ब्रास रेती अवैध रितीने चोरटी वाहतूक करतांना मिळून आल्याने दोन्ही ट्रक्टर चे चालक मालक असे चार आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही
मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडै
यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चिंचोलकर , पो.उपनी पाटील , पोहवा पडोले, दोनोडे, पोना भानारकर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केली.
परंतु तुमसर पोलीस स्टेशन हद्दीत आणखी ट्रक्टर अवैध रेती वाहतूक परवान्याने जात असतात तुमसर पोलीस विभागाने कार्यवाही करणे गरजेचे आहे.



