तुमसर मध्ये अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टीप्पर वर कार्यवाही
अजुन अनेक अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याची आवश्यकता
भंडारा जिल्हा वार्ता:-तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरला गावातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टीप्पर क्र. MH-49-BU-0077 अंदाजे किंमत 40,00000/-रु.चालक राहुल झेलकर आणि मालक सचिन लांजेवार यांच्या संघमताने नदी पात्रातून चोरी ने रेती टीप्पर ने नेत असल्याची घटना समोर आली आहे. त्या टीप्पर मध्ये 8 ब्रास रेती अंदाजे किंमत 48,000/- असा एकुण 40 लाख, 48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चालक मालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दिवसेंदिवस वेगाने धावत असलेल्या वाहनांमुळे अनेक अपघात होत जामुळे नागरिक आपला जीव गमावत आहेत यासाठी
वाहतूक नियंत्रण पोलीस उपशाखा तुमसर चे
हेड कॉन्स्टेबल पंकज बहेकार
यांनी वेगाने धावणाऱ्या वाहतूकीवर नियंत्रण ठेऊन होणाऱ्या अपघातावर आळा घालावे .
मागे IPL सट्टा, सट्टा पट्टी, रेती, व मोह फुल दारू ह्यावर कार्यवाही झाली परंतु आणखी अनेक अवैध धंदे ला उधान आलेला आहे.
अशा प्रकारे चालवणाऱ्या अवैध धंद्यावर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अंकुश लावणे ही काळाची गरज आहे.