सामाजिक
नाकाडोंगरी येथे महापरिनिर्वाण दिवस साजरा…

नाकाडोंगरी वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवसांवर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे*भिम मेळावा उत्सव समिती नाकाडोंगरी* , *पंचशील बौध्द विहार* समीती तसेच गावकऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून आणि पुजाअर्जना करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय नाकाडोंगरी येथे सर्व पदाधिकारी आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन अभिवादन करण्यात आले. सायं. ६ वाजेला संपूर्ण गावात कॅन्डल मार्च रैली काढण्यात आली.ह्या कार्यक्रमात बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.



