सामाजिक

सोशल मीडियाच्या युगातही वाचनाचे महत्त्व अबाधित – सुमंत देशपांडे

शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षपदावरून प्रा. देशपांडे बोलत होते.

कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी 100 हून अधिक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे धनंजय दलाल यांनी ग्रंथालय चळवळ अधिक बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रंथालये, ग्रंथ सेवक आणि कार्यकर्त्यांचे मोठे संमेलन घेण्याची घोषणा केली. तसेच शासकीय ग्रंथालयांसाठी ग्रंथ खरेदी आणि प्रशासकीय सुविधांबाबतही आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बोपचे यांनी केले. सिल्ली येथील प्रगती ग्रंथालयाला राज्य शासनाकडून ‘ड वर्ग’राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी प्रा. देशपांडे यांनी तरुणांमधील वाचन संस्कृतीवर भाष्य करताना न. सी. फडके, वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा विशेष उल्लेख केला. जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांनी ग्रंथालयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले.

कार्यक्रमात भारतरत्न माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button