क्राइम
अवैध रेती वाहतुकीवर स्था. गु. शा. ची कार्यवाही…

तुमसर वार्ता:-तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा येरली येथे स्थायिक गुन्हे शाखा भंडारा चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना मौजा येरली येथे अवैध रेती बिना परवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने आरोपी गिरीश भगत यांच्या ताब्यातून हिरव्या रंगाचा जॉन डियर कंपनी चा ट्रॅक्टर व ट्रॉली आणि एक ब्रास रेती अशी एकूण किंमत 7 लाख 6 हजार रुपये रेती चोरी करतांना मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व स्था.गु.शा. भंडारा चे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात पोउपनि पाटील, पोहवा पडाले, पोशि ढबाले स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली.




