संविधान दिवस साजरा करण्यात आला…

खापा वार्ता: -दिनांक 26/11/2025प्रहार दिव्यांग संघटना तुमसर व पशुवैद्यकीय दवाखाना खापा यांच्या संयुक्त विद्येमाने संविधान दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी 26/11 च्या हल्यात शहीद झालेल्या सुर विराणा श्रद्धांजली वाहुन 2 मिनटाच मौन धारण करण्यात आले. तसेच संविधान दिवस निमित्त उद्देशीकाचे वाचन करून शपथ घेण्यात आली. कार्यक्रम चे अध्यक्ष सौ कीर्ती ताई राजेंद्र पिकलमुंडे सरपंच, प्रमुख पाहुणे हंसराज ठवकर उपसरपंच, डॉ. पाटील साहेब पशु. अधिकारी, डॉ. गिरी, डॉ, मनोजकुमार नंदेश्वर साहेब पशु. अधिकारी, राजेंद्र पिकलमुंडे सामाजिक कार्यकर्ते, यादव बुराडे, शेषराव गणवीर (तुमसर तालुका प्रमुख प्रहार दिव्यांग संघटना तुमसर) डॉ. सुभाष सोनवणे, भगवान ठवकर, मारोती उमरकर, माहुले, चौधरी, व समस्त गावकरी उपस्थित होते कार्यक्रम चे सूत्रसंचालन शेषराव गणवीर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. नंदेश्वर साहेब यांनी केले.



