वेश्याव्यवसाय रॅकेट चा पर्दाफाश…

भंडारा वार्ता:-स्था गु. शा.व अनैतिक मानवी वाहतूक यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार मौजा बेला येथे अवैध देह व्यापार चालत असल्याची मिळालेल्या गोपनिय माहिती वर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक महिना आरोपी चार पुरुष आरोपी मिळुन आले तसेच तिन पिडीत महिला मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून सखी वन स्टाप भंडारा येथे दाखल करून पाच आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. स्था. गु. शा. भंडारा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी यांनी सुरू असलेल्या देह व्यापार रॅकेट चा पर्दाफाश करून उत्तम कामगिरी केल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात स्था. गु. शा. चे पोलीस निरीक्षक चिंचोलकर व सपोनि केशव कुंचलवाळ, कर्मचारी करीत आहेत.



