क्राइम
गोवंश तस्करी करणाऱ्यावर कार्यवाही…

साकोली वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलीस स्टेशन चे कर्मचाऱ्यांने अशोक ले ल्यान्ड कंपनी च्या ट्रक मध्ये अवैध रितीने चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना क्रूरतेने दाबून 36 जनावरे नेत असताना मिळुन आले असून साकोली पोलीसांनी ट्रक ला ताब्यात घेऊन अवैध रीतीने गौवंश वाहतूकीवर कार्यवाही करुन त्यांच्या ताब्यातुन गौवंश आणि अशोक ले ल्यान्ड कंपनी चा ट्रक ज्याची अंदाजे किंमत 23 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात साकोली स्टेशन चे पोलीस अधिकारी करीत आहेत.



