क्राइम
रेती तस्करीवर पोलीसांची कार्यवाही…

सिहोरा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील सिहोरा पोलीस स्टेशन सिहोरा पोलीस स्टेशन चे कर्मचारी स्टाफ सह पेट्रोलिंग करीत असताना मालक सहादेव ढबाले व चालक महेंद्र ढबाले याचा ताब्यातुन जान्डीअर कंपनी चा ट्रक्टर व बिना क्रमांकाची ट्रॉली मध्ये अवैध रेती वाहतूक करतांना मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातुन ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन ,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सिहोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांच्या मार्गदर्शनात पोहवा गयगये यांनी केली असून पुढील तपास सिहोरा पोलीस स्टेशन चे अधिकारी करीत आहेत.



