Uncategorizedक्राइम
अवैध मुरुम उत्खनन व तस्करीवर पोलीसांची कार्यवाही…

पालांदुर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील पालांदुर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा पाचगाव टोलीच्या शेत शिवारात पालांदुर पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना अवैध मुरुम उत्खनन करून वाहतूक करतांना आरोपी वामन धारने, अजय मेश्राम, सुरज लांजेवार, आदित्य नखाते हे आरोपी आढळून आल्याने त्यांच्या ताब्यातुन टीप्पर, जेसीबी, अवैध मुरुम याची अंदाजे एकुण कि. ५७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपी च्या ताब्यातुन जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पालांदुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सतीश बंसोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पेंदोरे, पोशि. सिंगणझोळे पोलीस स्टेशन पालांदुर चे कर्मचारी करीत आहेत.