क्राइम
अवैध दारू हातभट्टी वर कार्यवाही…

गोबरवाही वार्ता:-गोबरवाही पोलीस स्टेशन चे कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार मौजा धुटेरा च्या जंगलात आरोपी शिवप्रसाद पुसाम हातभट्टी दारु व्यवसाय करीत असल्याचे माहिती मिळाली. आरोपी च्या ताब्यातुन गोबरवाही पोलीसांनी छापेमारी केली असता प्लास्टिक बोरीत सडवा मोहफुल अंदाजे किंमत ४८,००० रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही गोबरवाही पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोशि गभने ,पोहवा कडव, किरपाने यांनी केली असून पुढील तपास गोबरवाही पोलीस स्टेशन चे अधिकारी करीत आहेत.

स



