राज्य
नाकाडोंगरी येथे दहीहांडी स्पर्धा…
तान्हा पोळ्याचा आयोजन.
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावात तान्हा पोळा व मारबत निमित्ताने 24 ऑगस्ट रविवारला भव्य दहीहांडी चा आयोजन बजरंग दल यांच्या मार्फत घेण्यात येत आहे. ही स्पर्धा निशुल्क असुन विजयी टीम ला 11111 रुपयांच्या नगद पारितोषिक दिले जाणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात येईल.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सुमित गौपाले सरपंच ग्रा. प. नाकाडोंगरी,डॉ.सचीन बावनकर, कपिल जैन, विशेष अतीथी राहुल जैन, टींकु यादव, विक्की मेश्राम , शामु मुर्खे, प्रफुल्ल गुप्ता, रोहीत पारधी, अंकीत परबते , निखिल पारधी, गुरुदेव राऊत, राजा गौपाले, शरद उचिबगले, आशिक यादव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
आयोजकाद्वारे असे आवाहन करण्यात आले की जास्तीत जास्त लोकांनी दहीहांडी स्पर्धेत भाग घ्यावे.




