राजकीय
तुमसर शहर आणि तालुक्यात वाढलेल्या घरफोडी व चोरीच्या घटनांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) कडून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन…
भंडारा जिल्हा:-तुमसर शहरासह संपूर्ण भंडारा जिल्ह्यात गेल्या काही काळापासून घरफोडी, चोरी आणि गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा ढवळ्या चोरीसारख्या घटना घडत असून, पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) भंडारा जिल्हा यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष आदरणीय चरण भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वात गृह उपविभागीय पोलीस अधिकारी पोलिस अधीक्षक कार्यालय भंडारा श्री. सुभाष बारसागडे यांना आज दिनांक ०4 ऑगस्ट २०२५ रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
- वाढलेल्या चोरी व घरफोडीच्या घटनांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.
- रात्रीच्या वेळी गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळावी.
- शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा योग्य वापर करून चौकशी गतीमान करावी.
- “डायल 112” सेवा प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात यावी.
- प्रत्येक पोलीस स्टेशनमधून गुन्हेगारीविषयक दर आठवड्याला आढावा बैठक घेतली जावी.
या निवेदन प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा जनतेच्या सुरक्षेसाठी आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. निवेदन देताना उर्मिलाताई आगाशे जिल्हा उपाध्यक्ष भंडारा, मिनलताई कारेमोरे जिल्हा उपाध्यक्ष भंडारा, गौरव नवरखेले जिल्हा सरचिटणीस भंडारा , विनोद भाऊ वटी जिल्हा सरचिटणीस भंडारा ,अजय मेश्राम जिल्हा सचिव भंडारा, मेहताबसिंग ठाकूर जिल्हा सचिव भंडारा, बालचंद पाटील जिल्हा नियोजन प्रमुख भंडारा , चंद्रशेखर भिवगडे जिल्हाध्यक्ष सेवादल,रवीजी येळणे जिल्हा अध्यक्ष ओबीसी आघाडी, युवक प्रदेश सचिव एड. स्वप्निल येरणे, हरिश्चंद्र बंधाटे प्रसिद्धीप्रमुख ,नितेश मारवाडे युवक जिल्हाध्यक्ष भंडारा,जितेंद्र धनराज तुरकर जिल्हा सचिव, कृष्णा बनकर जिल्हा सहसचिव,गीतेश ठोंबरे वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष, बालचंद मडावी जिल्हाध्यक्ष आदिवासी विकास सेल, जवाहर कुंभलकर जिल्हाध्यक्ष अभियंता सेल, भास्कर हटवार तालुकाप्रमुख साकोली,
राजेंद्र तुरकर तालुका प्रमुख तुमसर,
रत्नाकर थाटकर तालुका अध्यक्ष लाखांदूर, पुंडलिकजी शेंडे सचिव लाखांदूर, इंद्रजीत येळणे शहर उपाध्यक्ष, अंकुश दमाहे तालुका अध्यक्ष ओबीसी, हंसराज आगाशे तालुकाध्यक्ष मोहाडी, संगीताताई उईके लाखनी, किशोर मोहतुरे लाखनी, संजय खंडाइत तालुका अध्यक्ष लाखनी, मधुकर चौधरी शहर अध्यक्ष भंडारा,मधुकर भोपे ,घनश्यामजी वंजारी तालुका अध्यक्ष पवनी, अश्विन जी शेंडे तालुकाध्यक्ष मोहाडी ,मोतीलाल येळने जिल्हा सचिव ओबीसी आघाडी, ,हेमराजजी नागफासे शहराध्यक्ष तुमसर उपस्थित होते.