सिहोरा येथे महसूल सप्ताह साजरा…
तुमसर वार्ता:- प्राप्त माहितीनुसार *छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियान मंडळ सिहोरा* तर्फे ग्रामपंचायत कार्यालय सिहोरा येथील सभागृहात समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. सदर समाधान शिबिरात उत्पन्न दाखले सातबारा वाटप झाले.जिवंत सातबारा संबंधाने अर्ज स्वीकारणे फार्मर आयडी तयार करणे, जातीचे प्रमाणपत्र क्रिमिलेअर प्रमाणपत्र संजय गांधी व श्रावण बाळ योजनेत संबंधी डीबीटी बाबत माहिती देणे, पीएम किसान योजना, सातबारा वाटप, अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड इत्यादी योजनेविषयी माहिती देण्यात आली सदर समाधान शिबिराला माननीय *जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत व सुभास बोरकर उपसभापती पं. स.तुमसर तसेच पि.टी.सतदेवे मंडळ अधिकारी साहेब सिहोरा* यांचे अध्यक्षतेखाली तसेच मंडळातील तलाठी कुमारी श्वेता नंदुरकर कुमारी जयश्री कानकाटे श्री कावळे तलाठी सोनवाने तलाठी बर्वेकर तलाठी येरचे तलाठी कुमारी हिरकन्या तलाठी व महसूल सेवक गटारे मते शुक्ला महेश बीसणे श्रीमती पारधी बाई हे या कार्यक्रमाला उपस्थित होते व सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाची सांगता करून कार्यक्रम संपविण्यात आला.




