अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड….
आंधळगाव पोलीसांची कार्यवाही…
आंधळगाव वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा पांढराबोळी येथील फिर्यादी अल्पवयीन मुलीला आरोपी प्रकाश सुखदेवे यांनी मुलगी अल्पवयीन आहे असे माहित असुन तिला आपल्या मोटर सायकल वर बसवून साईलाज जमनी ईथे नेऊन बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध बनविले. फिर्यादी च्या तोंडी तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध कलम 65(1) 137(2) भा. द. वि. सहकलम 4,8 पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास नितीन राठोड पोलीस निरीक्षक आंधळगाव हे करीत आहेत.
तसेच दुसरी घटना पिडीत अल्पवयीन मुलगी रा. खैरलांजी ईच्या सोबत आरोपी रनजीत खुर्पे यांनी मुलगी अल्पवयीन आहे असे माहित असतांना सुद्धा आरोपी ने तिचे पाठलाग करुन तिचे सोबत मैत्री करुन तिला आंबागळ किल्यावर नेऊन तिची छेळछाळ केली आणि मोबाईल वर अश्लिल फोटो काढून तिला वारंवार फोन करून भेटायला ये नाहितर फोटो बनवून वायरल करील अशी धमकी दिल्याचे अल्पवयीन पिडीत मुलीच्या तोंडी रिपोर्ट वरुन सदर गुन्हा नोंद करून कलम 78(1) (एक) (2) 74,75(2) 351(2) भा. द. वि. सहकलम 8,12 लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधि. गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर तपास पोउपनि अनिल गेडाम हे करीत आहेत.



