क्राइम
अवैध रेती तस्करीवर कार्यवाही…

अड्याळ पोलीसांची कार्यवाही…
अड्याळ वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस स्टेशन चे कर्मचारी आपल्या स्टापसह पेट्रोलिंग करीत असताना मौजा शिवाजी चौक अड्याळ येथे स्वराज कंपनी चा ट्रॅकर मध्ये एक ब्रास रेती बिना परवान्याने वाहतूक करतांना ट्रॅक्टर चालक ईश्वर तुमळाम रा. चिखली व मालक प्रदिप चौधरी रा. चिखली तह. पवनी यांच्या ताब्यातुन 7 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,अड्याळ सहा.पोलीस निरीक्षक धंनजल पाटील यांच्या मार्गदर्शनात पोहवा मारबते यांनी केली असून पुढील तपास अड्याळ पोलीस स्टेशन चे अधिकारी करीत आहेत.




