Uncategorizedशालेय
आदर्श इंग्लिश स्कूल ठाणा जवाहरनगर इयत्ता 10 वी निकाल 💯 %विद्यार्थ्याचे यश
भंडारा : आदर्श इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ठाणा जवाहरनगर येथील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 💯%लागला.

शाळेतील ३९ विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते. २१ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आणि १२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत स्थान मिळवले. तर ६ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या श्रेणीत स्थान मिळवले.
उन्नती इटनकर आणि प्रणोती सतदेवे यांनी ९१.५% गुणांसह शाळेतून पहिला क्रमांक पटकावला. आदर्श रंगारी आणि नुपूर बावनकुळे यांनी ९१ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. अक्षरा रंगारी ९०.४% गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मुलींनी शालेय मुलींना मागे टाकले. शाळेतील विद्यार्थ्यांनी याचे श्रेय शिलवंत रंगारी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि शाळेतील सर्व शिक्षकांना दिले.
“आदर्श इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ठाणा जवाहरनगर इथे शिक्षणा सोबत विविध उपक्रम राबवले जातात. संगणक विषयी माहिती, खेळ, कला,साहित्य संस्कृती, इत्यादी.
Bite-
शीलवंत रंगारी शाळा व्यवस्थापक
धम्मपाल बौद्ध जिल्हा प्रतिनिधी भंडारा