ठक्कर बाबा योजना मध्ये मंजूर झालेल्या कामात फेरबदल व्हावे…
आदिवासी बांधवांची मागणी…
तुमसर वार्ता:-चिखला गावातील ग्रामपंचायत मध्ये मंजूर झालेल्या ठक्कर बाबा आदिवासी बस्ती सुधार योजना अंतर्गत सभामंडप, सिमेंट रस्ता, हायमास्ट लाईट मंजूर झाले होते परंतु मंजूर झालेले कामे आदिवासी समुह च्या ईच्छा विरुद्ध आहेत . एकात्मिक आदिवासी प्रकल्प भंडारा त्यांना दिलेल्या पत्रामध्ये वाचनालय, पिण्याचे पाणी, समाज मंदिर ईत्यादी असे कामाची गरज आहे. मंजूर झालेल्या कामाची गरज नसुन ग्रामसभा पुन्हा ठेवण्यात यावी. आदिवासी समाजातील हितकार्याचे कामे मंजूर करावे अशी आदिवासी समाज बांधवांची मागणी होती. अन्यथा आदिवासी बांधवामार्फत ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले होते. आदिवासी बांधवांची मागणी पूर्ण न झाल्याने २० मे ला ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणावर प्रामुख्याने, सरपंच कोकोडे ताई,ग्रामसेवक राऊत, पोलीस कर्मचारी व संजय ऊईके, वैभव वाढीवे, शिशुपाल गेडाम, गोविंदा मरस्कोल्हे, काजल परतेती, अल्का वाढीवे, सशिकला आरामे व अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते. त्यावेळी गटविकास -गटविकास अधिकारी नंदकुमार वालेकर व तुमसर पंचायत विस्तार अधिकारी राजु मंहत, यांनी आश्वासन दिले की नव्याने विशेष ग्राम सभा घेऊन कामाचा आराखडा तयार करावा असे तोंडी आश्वासन दिले. उपोषण कर्त्यांनी म्हटले की आश्वासन खोटे निघाले तर पंचायत समिती तुमसर समोर उपोषण करण्यात येईल.




