नशा मुक्ती वर विद्यार्थ्यांना जनजागृती…
ठाणेदार विजय कसोधन यांचे मार्गदर्शन…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्हा पोलीस विभागाच्या जागर नशा मुक्ती अभियानाच्या वतीने सिहोरा पोलीस स्टेशन मार्फत कनिष्ठ महाविद्यालय व महाराष्ट्र हायस्कूल सिहोरा येथे जागर नशा मुक्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमात सिहोरा पोलीस स्टेशन चे ठानेदार विजय कसोधन यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सांगितले की अमंली पदार्थ नशेमुळे आत्मविश्वास दिशाहीन होऊ शकतो व आजची तरुण पिढी देशाचे उज्वल भविष्य आहे.
अमंली पदार्थांचे सेवन करणे व खरेदी विक्री करणे हे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कडक शिक्षा होऊ शकते. विद्यार्थ्यांनी ह्या सर्व व्यसनापासून मुक्त राहावे.
ह्या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी नशा मुक्ती ची सामुहिक शपथ घेतली.
विद्यार्थ्यांमध्ये नशा मुक्ती बाबत जागर निर्माण करण्यासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण 65 विद्यार्थी सहभाग होऊन स्पर्धे द्वारे नशा मुक्ती वर आपले मनोगत व्यक्त केले.