हेमराज नागफसे तुमसर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट).
तुमसर वार्ता:-नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तुमसर शहर कार्यकारिणी जाहीरनॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) च्या तुमसर शहर कार्यकारिणीची नवी यादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मा. चरण भाऊ वाघमारे यांच्या मान्यतेने नुकतीच जाहीर करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीत श्री. हेमराज नागफासे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून श्री. शिवा दमाहे, देवेंद्र तलमले, विजय चौरसिया, पुरुषोत्तम बांडेबुचे आणि अनिल निखाडे यांची नेमणूक झाली आहे.सरचिटणीस पदासाठी अजय बडवाईक, प्रवीण कहालकर, सोनू हटेवार आणि अशोक बनकर यांची निवड झाली असून, सचिव म्हणून सौ. जयश्रीताई इखार, सौ. दुर्गा कुरंजेकर, रोशन कारेमोरे, सुशांत देशमुख व दीपक रीनायते यांचा समावेश आहे. सहसचिव म्हणून योगेश आजापुजे, राकेश भेलावे, राजू बडवाईक, विजय आस्वले, आकाश कनोजे आणि किशोर माटे यांची नेमणूक करण्यात आली आहे.शहर कार्यकारिणीत श्री. छोटू बावनकर यांच्याकडे कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून शहरात पक्षाची विचारधारा अधिक बळकट होईल व संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.