कोंबडी चोर पोलीसांच्या ताब्यात…
चिखली गावातील घटना…
तुमसर ग्रामीण वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखली गावात शुभम अडमाचे यांच्या पोर्ल्ट्री फार्म हाऊस मधुन पंधरा कोंबड्या अज्ञात आरोपींनी चोरून नेले ही घटना घडल्यामुळे याची तक्रार शुभम अडमाचे यांनी गोबरवाही पोलीस स्टेशन ला देण्यात आली. ह्या घटनेची गोबरवाही पोलीसांनी चिखली गावात विचारपुस केली असता आरोपी सुनील पेंदाम, रितीक गजाम, अमित सयाम, जितेंद्र पेंदाम यांनी कोंबड्या चोरुन नदी काठावर पार्टी केल्याची कबुली केली. आरोपी विरुद्ध 327/303 अन्वये गुन्हा नोंदवुन अटक केली व आरोपी ला न्यायालयात पाठविण्यात आले.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंयक माधव

यांच्या मार्गदर्शनात गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठाणेदार शरद शेवाळे यांनी केले.पुढील तपास पोहवा मेंगेश गेडाम, रुपेश ठाकरे, नेपाल गभने हे पोलीस कर्मचारी करीत आहेत.