पुरातन काळापासून गोयंका परिवार गणेश उत्सव करतोय साजरा…
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील पवणारखारी एक छोटासा गाव असून ह्या गावात 86 वर्षापासून गोयंका परिवार गणेश उत्सव साजरा करीत आहेत. सन 1950 च्या पुर्वी भारतात ईग्रेजांचे शासन होते. ह्या परीसरात चिखला, डोंगरी बुजुर्ग मॉईल हे ईग्रेजांच्या ताब्यात होते ह्यामध्ये काम करणारे कामगार बाहेर राज्यातील होते. त्यावेळी ईग्रेजांच्या शासनकाळात व त्यांच्या विरोधात लढा तीव्र झाला होता . लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी महाराष्ट्र राज्यात गणेश उत्सवाची स्थापनेची संकल्पना केली होती. त्यावेळी मोहनलाल गोयंका यांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली असून त्यांचे आठनी बाहेर राज्यातील कारागीर बोलवून झांकीया निर्माण करण्यात आली. यामध्ये रामायण, महाभारत, कृष्ण जन्म, सिताहरण, रावण वध अशा अनेक दरवर्षी झांकीया दाखविल्या जातात.

ह्या वर्षी समुद्र मंथन ची झांकीया दाखविल्या जात आहे.

या गणेश उत्सवाची आयोजन मनीष गोयंका व संपूर्ण गोयंका परिवार स्वखर्चाने दर वर्षी करीत आहेत. ह्या गणेश उत्सवात भंडारा, गोंदिया, बालाघाट, नागपूर, कटंगी, सिवणी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दहा दिवसांचा आनंद घेतात. या यात्रेत रंगबिरंगी वस्तुचे दुकाने, मनोरंजक दुकाने असतात.
ह्या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासन तसेच गोबरवाही पोलीस स्टेशन चा विशेष बंदोबस्त असतो.



