पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यावर विविध ठिकाणी कार्यवाही…!!

भंडारा जिल्हा वार्ता:-
भंडारा जिल्ह्यात
मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी
पदभार सांभाळताच प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये अवैध धंद्यावर अंकुश लावण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून ह्या जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन चे अधिकारी व पोलीस हवा. यांच्या सहकार्याने कार्यवाही केली. जिल्हा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार-
रेती चोरी
तुमसर पोलीसांची कार्यवाही
मौजा नवरगाव येथे बेकायदेशीर रेती वाहतूक करतांना जितेंद्र मारबदे रा. उमरवाळा याला पोलीसांनी अवैध रेती वाहतूक करतांना पकडले आणि त्याच्या ताब्यातून स्वराज कंपनीचा ट्रक्टर आणि रेती असा एकुण ७ लाख ६०००/-रुपयांना मुद्देमाल जप्त करुन तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सपोनि साखरे करीत आहेत.
-अड्याळ पोलीस ठाण्यात गैरकायदा मंडळी अड्याळ पोलीस स्टेशन येथे फिर्यादी वैभव जगनाडे रा. मकरधोकडा यांनी दिलेल्या तक्रारी नुसार आरोपी विनोद वंजारी रा. मौदी पुनर्वसन व त्यांच्या साथीदारांनी फिर्यादी ला मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला असून गुन्हा दाखल करण्यात आला. ह्या गुन्ह्याचा तपास ठाणेदार धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनात पोउपनी चव्हाण करीत आहेत.
#अंमली पदार्थावर कार्यवाही#
भंडारा पोलीसांची कार्यवाही
भंडारा येथे गौतम बुद्ध वार्डात छापा टाकून शुमम हापसे यांच्या कडून ०.१८२ कि. लो. अमंली पदार्थ गांजा याची कि. २१,०००/-रु.मुद्देमाल जप्त करण्यात आले व गुन्हा नोंद करण्यात आला तपास पोलीस निरीक्षक भुसारी यांच्या मार्गदर्शनात सपोनि खंदाळे करत आहेत.
मर्ग नोंदी
जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत परसोडी येथील दिलीप बुधराम हटवार याचा मृत देह वैनगंगा नदी पात्रात आढळून आले तपास ठाणेदार भिमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात पोना विजय चाहुदे करत आहेत.
सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिलेगाव येथील रोशन तुलसीदास येळे याचा मृतदेह शेतात आढळून आल्याने तपास ठाणेदार विजय कसोधन यांच्या मार्गदर्शनात मपोहवा बांते करीत आहेत.
सर्व झालेल्या घटनांचे तपास
जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन
यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व तपास पोलीस कर्मचारी योग्य रितीने करीत आहेत.




