राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे भंडारा येथील अधिकारी राजस्व बुडवून शासनाला लावतात चुना…

भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्हात भंडारा जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क अधिकारी भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपात संलग्न असल्याचे गंभीर आरोप असल्याच्या गंभीर तक्रारी नागरिकांकडून समोर येत आहेत. राज्य उत्पादन शुल्क महा. राज्य ह्या मंत्रालयाचा मुख्य उद्देश शासकीय मद्यविक्री पासुन जो राजस्व सरकारला जमा होतो त्यामध्ये शासनाला करोडो अब्जो रुपयांचा राज्य व देश पातळीवरविकास कामाकरीता होतो परंतु ह्या सर्व बाबी अंथरून शासनाचे अधिकारी नियमबाह्य मार्गांनी स्वतः च्या आर्थिक फायदा करून घेत असल्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही परवानाधारक व्यवसायीक व्यक्ती कडून अवैध वसुली करण्याच्या घटना समोर येत आहे व तपासणी दरम्यान परवाना धारकांकडे जाऊन शिथिलता दाखवून योग्य तपासणी न करता त्यांच्या कडून पैसे उकडने अशा अनेक तक्रारी समोर येत आहे. तुमसर/मोहाळी क्षेत्राकरिता एक राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक नेमल्या जातो तसेच साकोली विभागात सुध्दा उत्पादन शुल्क निरीक्षकाची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. परंतु हे अधिकारी नियमांची पायमल्ली करुन स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी अवैध रक्कमेची वसुली करत असल्याची माहिती मिळत आहे. ह्या विभागाच्या निष्क्रियतेने शासनाची तिजोरीत कोट्यावधी रुपयांचा महसुलापासुन कोसो दुर असल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे. काही सुत्रांनी माहिती दिली की अनेक परवाने धारक, तपासणी थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांचा खिसा गरम करण्याची पद्धत दिसून येत आहे. अवैध दारू विक्रेत्यांकडून सुध्दा जसे परवानाधारक सोडून काही ठिकाणी धाबे, रेस्टॉरंट , मोहफुल दारू कंपनी मधुन सुध्दा ह्या विभागातील अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याचे समोर येत आहे. राज्य शासन (राज्य उत्पादन शुल्क मंत्रालय मुंबई) मार्फत अहोरात्र प्रयत्न करून उत्पादन शुल्क विभागात कसी महसुलीत वाढ होणार ह्याकडे विशेष मोहीम राबवली जात आहे परंतु विशेष अधिकाऱ्यांच्या घशात रक्कम गेल्याने हा महाराष्ट्र राज्य आर्थिक दृष्ट्या कसा बलाढ्य होणार ❓ जिल्ह्यातील नागरीकांडून महसुलीची गळती रोखण्यासाठी मंत्रालय राज्य उत्पादन शुल्क मुंबई कडून अशी अपेक्षा आहे की या विषयाची गांभीर्याने विचार करून विशेष पथक नेमणूक करुन भ्रष्ट अधिकाऱ्यावर कार्यवाही करुन महसूली च्या टक्कयामध्ये वाढ करावी.




