क्राइम
अवैध रेती तस्करीवर पोलीसांची कार्यवाही…

लाखनी वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना गायधने मोहल्ला लाखनी येथे अवैध रेती ने भरलेला ट्रक्टर घटनास्थळावरून जप्त करण्यात आला. आरोपी चालक मालक रजत चांदेवार यांच्या ताब्यातील जॉन डियर कंपनी चा ट्रक्टर व एक ब्रास रेती त्याची एकुण किंमत ६ लाख ६ हजार रु. कोणतीही परवानगी न घेता वाहतूक करतांना मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध कलम ३०३(२) भा. न्या. स. सह. कलम( ८) महा. जमीन महसूल अधि. सह. कलम ७,९ पर्यावरण संरक्षण अधि. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक बारसे यांच्या मार्गदर्शनात पोहवा बोरकर, म पोहवा चाचेरे पोलीस स्टेशन लाखनी हे करीत आहेत.



